राष्ट्रवादीकडून बारामतीसह महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई | शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादीकडून बारामतीसह महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यभर आदोलनंही करण्यात येणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य बँकेत झालेल्या 25 हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणि ‘ईडी’ने अजित पवारांसह इतर 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज(बुधवार) सकाळी 10 वाजता बारामतीतल्या शारदा प्रांगण इथे जमून बारामतीकरांकडून याचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

माझ्यावर गु्न्हा दाखल केला असेल तर स्वागत करतो. सहकारी बँकेवर अनियमितता केल्याचा आरोप होता. पण ज्या संस्थेचा मी सभासदही नव्हतो, त्यात माझं नाव गोवलं गेलंय. याबाबत अधिक काही बोलण्याची गरज नाही. राज्यभरात माझे सुरु असलेले दौरे सुरुच राहतील, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

सहकारी संस्थांना मदत करणं गुन्हा नाही. आज माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर त्यांचं स्वागत आहे. मी राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो तिथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती तरच मला आश्चर्य वाटलं असतं, असंही शरद पावर म्हणाले. 

दरम्यान, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ‘ईडी’ची चौकशी मागे लावला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-