महाआघाडी सरकारची आज अग्निपरिक्षा; 170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा

मुंबई : सर्व नाट्यमय घडोमाडींनंतर सत्तेत आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. तसेच यावेळी शक्तिप्रदर्शनही केलं जाईल.

काही गडबड होऊ नये म्हणून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणार असला तरी 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा महाआघाडीने केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला 3 डिसेंबपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाईल.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि छोट्या पक्षांसह आघाडीला 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-