आज सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, पाहा काय आहेत भाव

नवी दिल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत

आजच्या सोन्याच्या भावात 10 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति ग्रॅम भाव 44 हजार 690 रुपये झाला आहे. काल सोन्याचा भावा 160 रुपयांची वाढ झाली असल्यामुळे सोन्याचा प्रति ग्रॅम भाव 44 हजार 480 रुपये इतका होता.

चांदीच्या आजच्या भावात 300 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलो भाव 66 हजार 200 रुपये झाला आहे. काल चांदीच्या भावात 800 रुपयांची वाढ झाली असल्यामुळे चांदीचा प्रति किलो भाव 66 हजार 500 रुपये होता.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. तसेच येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत 42 हजार प्रति दहा ग्रॅम रुपयांपर्यंत घसरू शकते, असे अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरील लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धमाकेदार ऑफर! 1.45 लाखांची ‘ही’ बाईक खरेदी करा फक्त 45 हजारात…

सुक्या मेव्यातील अक्रोड आहे आरोग्यदायी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

“मोदी सरकारने मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे”

….म्हणून आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ प्रदर्शापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात…!

अचानक सापडला सोन्याचा डोंगर; सोनं लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ