आजचे राशिभविष्य! या राशीच्या कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजाराने ग्रस्त होतील

Today Horoscope l मेष:- आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

वृषभ:- कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता. गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मिथुन:- घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल. प्रेमसंबंधात एकमेकांबद्दल सतर्क आणि सावधगिरी बाळगा

कर्क:- शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल. तुमच्या कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजाराने ग्रस्त असल्यामुळे तुम्हाला खूप मानसिक त्रास होईल

Today Horoscope l सिंह:- बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आर्थिक धनलाभ होईल. कुटुंबासमवेत फिरायला जाऊ शकाल.

कन्या:- आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.

तूळ:- बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्याचा अभाव राहील.

वृश्चिक:- गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनू:- दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात. जवळच्या मित्राशी विनाकारण वाद होईल.

मकर:- आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल. काही महत्त्वाच्या योजनेत व्यत्यय येईल.

कुंभ:- आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य रागावून घरातून निघून गेल्यास कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण होईल.

Today Horoscope l मीन:- नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य. कुटुंबातील वादामुळे तुम्ही नाराज राहाल.

महत्वाच्या बातम्या – 

अरे वा…लुना मोपेड लॉन्च! फुल चार्जमध्ये धावणार तब्बल इतके किलोमीटर; ‘ही’ असतील खास वैशिष्ट्य

अनुपम खेर झाले भावुक…अवघे 37 रुपये घेऊन मुंबईत आले होते आणि आता…

वयाच्या 44 व्या वर्षी असा कॅच कोण घेत रे भाऊ? CSk च्या खेळाडूने घेतला असा कॅच की…

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! या भागात पडणार अवकाळी पाऊस

मोठी बातमी! पुण्यातील गुंडगिरी संपणार, पोलीस आयुक्तांनी घेतला सर्वात मोठा निर्णय