आजचे राशिभविष्य! या राशीवर होणार बुध ग्रहाचा प्रकोप ;जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागणार

Today Horoscope l मेष:- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. वैयक्तिक बाबींमध्ये संधीचा फायदा घेऊ शकता. अनुभवी लोकांकडून शिका आणि सल्ला द्या.

वृषभ:- हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. आवडत्या कामात दिवस घालवाल. कौटुंबिक परिस्थिती सकारात्मक राहील.

मिथुन:- पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा. मित्रांचा विश्वास जपतील.

कर्क:- अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

Today Horoscope l सिंह:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल. घरगुती वस्तूंची खरेदी शक्य आहे.

कन्या:- मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. जवळच्या लोकांना तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडेल.

तूळ:- सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी. कुटुंबाला अधिकाधिक वेळ द्याल. संतुलित आणि संयमित गतीने पुढे जा.

वृश्चिक:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी. वैयक्तिक कामात पुढाकार ठेवा.

धनू:- तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान शोधावा.

l मकर:- शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.

कुंभ:- जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न होतील. काम पूर्ण करण्यासाठी सज्ज होईल. शारीरिक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Today Horoscope l मीन:- मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आरोग्याबाबत संवेदनशील राहाल.

News Title : Today Horoscope

महत्वाच्या बातम्या –

या दिवशी होणार भारत विरुद्ध इंग्लंड सामना! पाहा राजकोटमध्ये टीम इंडियाची कामगिरी नेमकी कशी

…यापुढे शिक्षक होणे सोपे नाही! शिक्षण विभागाने घेतला हा मोठा निर्णय

बापरे! या कंपनीच्या इलेक्ट्रिक कार 1.20 लाख रुपयांनी झाल्या स्वस्त

अभ्यास करायचा कंटाळा येतोय? तर या 3 टूल्सची मदत घेऊन अभ्यास करा; सहज पास व्हाल

सिद्धार्थने कियाराला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी काय गिफ्ट दिले? अभिनेत्रीने सांगितले…