मुंबई | भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ ईडन गार्डन्स स्टेडियमवर आमने सामने आहेत.
रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर कायरन पोलार्ड तंदुरुस्त झाल्यानंतर कॅरेबियन संघाची जबाबदारी सांभाळत आहे. सर्वप्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने 158 धावांचं आव्हान भारताला दिलं.
एकीकडे वेस्ट इंडिजच्या विकेट पडत असताना निकोलस पुरनने 61 धावा करत वेस्ट इंडिजला सावरण्याचा प्रयत्न केला. काइल मेयर्सने देखील 31 धावा करत पुरनला साथ दिली. तर अखेरीस पोलार्डने फटकेबाजी केली.
वेस्ट इंडिजला प्रत्युत्तर देताना रोहित शर्माने धमाकेदार सुरूवात करून दिली. रोहित आणि इशान किशनने पाॅवर प्लेमध्ये चौकार आणि षटकाराचा धडाका लावला. रोहितने 19 चेंडूत 40 धावा केल्या.
टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये विराट कोहली 3227 धावांसह दुसऱ्या स्थानी होता. रोहितने आज 40 धावा करत टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये 3237 पुर्ण केल्या. यावेळी त्याने विराट कोहलीला मागे टाकलं.
रोहित बॅटिंग करत असताना विराटच्या 3227 टी-ट्वेंटी इंटरनॅशनल धावा होत्या. मात्र, रेकाॅर्ड मोडल्यानंतर रोहित लगेच बाद झाला. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या विराटने लगेगच आपलं स्थान कायम केलं.
विराट कोहलीने 12 धावा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा दुसऱ्या स्थानी आला. त्यानंतर मात्र, विराट मोठी खेळी करू शकला नाही. फक्त 17 धावा करत तो बाद झाला.
दरम्यान, कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी न करू शकल्याने आता विराटवर टीका होताना दिसत आहे. मात्र, एकाच मॅचमध्ये आकडे फिरल्याने आता रोहित विराट जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सुशांतच्या आत्महत्येनंतर…’; नारायण राणेंच्या नव्या दाव्याने राजकारणात खळबळ
Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”