महाराष्ट्र मुंबई

भाजप आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार; शिवसेनेला डिवचण्याचे प्रयत्न??

मुंबई |  पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक रविवारी (आज) गोरेगाव येथील नेस्को संकूलात पार पडणार आहे. ही बैठक भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बैठकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे सगळे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. याच बैठकीतून भाजप आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे.

मात्र आजच्या या बैठकीत भाजप शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू शकते असं बोलंल जातंय. त्याची प्रचिती काल जे.पी. नड्डा यांनी दाखवून दिली.

शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत बसू नका. तर आपल्याला सर्व मतदारसंघात काम करायचे आहे. हे लक्षात ठेवा, असा सूचक सल्ला जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

दुसरीकडे जे.पी.नड्डा भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. युतीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणं त्यांनी स्वाभाविक होतं. परंतू त्यांनी उद्धव यांची भेट घेणं टाळलं आहे.

गेले काही दिवस युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा’ चालू आहे. आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राच्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे जाण आहे. ते महाराष्ट्राचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतात, अशी वक्तव्य सातत्याने शिवसेनेचे नेते करत आहेत. यामुळेच भाजपच्या गोटात सध्या नाराजीचे सुर आहेत.

दरम्यान, आजच्या बैठकीनंतर खरंच शिवसेना भाजपचं ठरलंय की ठरलेलं आता विस्कटलंय, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मतदारांची माहिती आधारला लिंक करा; फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे मागणी

-“सरकारवर टीका करायची आणि पुन्हा एकत्र बसायचं ही शिवसेनेची नाटकबाजी”

-बाळासाहेब ठाकरेंची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी व्हावी; शिवसेनेची मागणी

-“युतीचा विचार सोडून निवडणुकीच्या तयारीला लागा”

-डिस्चार्ज दिलेल्या रूग्णाच्या पायात 2 इंचाची काच; मनसेने उघडकीस आणला हॉस्पिटलचा प्रताप

IMPIMP