पुण्यात आज 169 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 266 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 6258 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 537 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

165 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 35 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 169 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6795 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2331 एवढी आहे. तर आतापर्यंत 354 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात कोरोनामुक्त पोलिसांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 35 पोलिसांना डिस्चार्ज

-संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू- उद्धव ठाकरे

-चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे

-रायगडमधील ‘या’ समुद्र किनाऱ्यावर चक्री वादळाची शक्यता

-मनोज तिवारी यांना धक्का; भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी