Top news

Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं

Petrol e1634270906961
Photo Credit- Pixabay

नवी दिल्ली | 10 ते 15 दिवसांपासून इंधन (Petrol-Diesel Price Hike) दरात सतत वाढ होत आहे. दररोज जवळपास 80 पैशांची वाढ होत आहे. काल शुक्रवारी रेट स्थिर होते.

आज पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी मागील 10 दिवसांत पेट्रोल दरात 7 रुपयांहून अधिक वाढ केली आहे.

डिझेल दरही जवळपास याच दराने वाढला आहे. मुंबईत पेट्रोल 118 रुपये लीटरजवळ पोहोचलं आहे. तर डिझेलचा दर 100 रुपयांवर आहे.

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

दिल्लीत पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 117.57 रुपये आणि डिझेल 101.79 रुपये प्रति लीटर आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या- सुप्रिया सुळे 

सर्वात मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू 

‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश; लाखाचे झाले ‘इतके’ कोटी 

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी 

मोठी बातमी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्याचा कार्यक्रम होणार?