मुंबई | आज महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाविकास आघाडीला आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नियमाप्रमाणे सकाळी सकाळी एक ट्विट केलं आहे.
आज बहुमत दिन.. 170+++++ हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है… जमाने से हम नहीं, असं ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी आघाडीकडे 170 पेक्षा अधिक बहुमत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचं जुळवून आणण्यात त्यांच्या मोठा वाटा आहे. त्यांच्याच प्रयत्नाने महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंंत्री मिळाला आहे.
दरम्यान, विधानसभा निकाल लागल्यापासून संजय राऊत यांनी सामना अग्रलेख, ट्विट आणि पत्रकार परिषदा घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी दररोज पत्रकार परिषदा घेण्याचा सोडलं असलं तरी त्यांनी दररोज ट्विट करणे सुरुच ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कुटुंबासाठी महापालिकेकडून मिळणारी गाडी महापौरांनी नाकारली!- https://t.co/yWJf6v8qqq @KishoriPednekar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“गुप्त मतदान घ्या, दूध का दूध पानी का पानी होईल” – https://t.co/wGJjINPGSU @ChDadaPatil @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“अमित शहा यांनी एक जरी फोन केला असता तर आज युती तुटली नसती” – https://t.co/Q5K5DtiKlw @rautsanjay61 @AmitShah @BJP4India @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019