बाबो! मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर पुन्हा चढू लागले; वाचा आजचा दर

नवी दिल्ली | कोणताही सन म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

मात्र, गेल्या काही आठवड्यांमध्ये सोन्याचे भाव चांगलेच उतरले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून एमसीेएक्सवर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ पाहायला मिळू लागली आहे.  गेल्या दोन दिवसांत सोन्याचा दर प्रती तोळ्यामागे 450  रुपयांनी वाढला आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचा दर 45 हजार 290 रुपये प्रती तोळा ईतका आहे.

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र आज फार मोठी घट पाहायला मिळाली आहे. एमसीेएक्सवर आज चांदीचा दर 67 हजार 300 रुपये प्रती किलो आहे. सोन्या चांदीच्या दरात येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकंच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

फक्त ‘ही’ एक गोष्ट केल्यास तुम्हालाही 312 रुपयांनी स्वस्त मिळेल सिलिंडर; सविस्तर वाचा

जॅकलीनचा हा बोल्ड अंदाज पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

प्रतिलीटर पेट्रोलमधून 33 रुपये तर डिझेलमधून 32 रुपये कमाई करतंय सरकार, लोकसभेत दिली कबूली

नागरिकांनो वेळीच व्हा सावधान! मुंबईतील सर्वात मोठ्या कोविड हॉस्पिटलमध्ये आहे धक्कादायक परिस्थीती

भररस्त्यात तरुणानं मुलीचं अ.पहरण करण्याचा प्रयत्न केला, मग लोकांनी चांगलाच धुतला; पाहा व्हिडीओ