बऱ्याच दिवसापासून सोन्याचांदीच्या दरात चढउतार चालू होते. गेल्या काही दिवसांत सोन्याचांदीच्या भावात घसरन दिसून आली. यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारात 12 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती घसरल्या. अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकॉइनच्या किंमती वाढल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.
एमसीएक्सवर सकाळी 10.27 वाजता पाच एप्रिल 2021च्या सोन्याच्या वायदा भावात 0.06 म्हणजे 29 रुपयांची घट होऊन 47,479 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहचला. एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी घसरुन 47,475 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर मार्च महिन्यातील चांदीचा भाव 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 68,600 रुपये प्रतिकिलोवर आहे.
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात चढउतार पहायला मिळत आहे. अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत रुपया कमकुवत आहे. दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोन्याचांदीच्या चढउतारामुळे खरेदीवर फारसा काही फरक पडणार नाही. कारण भारतात सोने खरेदीला जास्त वाव आहे. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत. असंही काही जाणकारांचं मत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 4 डॉलर म्हणजे 0.22 टक्के घटीसह 1,822.80 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.
याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी मार्च, 2021 वायदा भाव 0.01 डॉलर म्हणजे 0.05 टक्के तेजीसह 27.06 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.
यापूर्वी मागील आठवड्यात सलग सोन्याची किमतीत घसरण नोंदविण्यात आली होती. सोमवारीच्या व्यापार सत्रात दिल्लीच्या सराफा बाजारात सोने-चांदी या दोन्ही वस्तूंच्या किमती नोंदवल्या गेल्यात. सोन्याचे भाव 94 रुपयांनी वाढून 46,877 रुपयांवर पोहोचले. तर चांदीच्या किमती 340 रुपयांची वाढ पहायला मिळाली.
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोलशिवाय चालणाऱ्या ‘या’ गाड्या लवकरच येणार बाजारात
उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, 5 लाखांहून आहे कमी किंमत
नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे
आता भारतात गाड्या 3 लाखापेक्षा स्वस्त; जाणून घ्या ‘त्या’ कोणत्या आहेत