अबब! सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा आजचे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल आहे. भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या चाहतीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत होती. सोन्याबरोबरंच चांदीच्या दरात देखील घट पाहायला मिळत होती. मात्र, आता पुन्हा या दरात वाढ अनुभवायला मिळत आहे.

आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा 100 रुपयांची वाढ झाली आहे.  काल MCX वर 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 200 रुपये प्रती तोळा होता. आज हाच दर 45 हजार 300 रुपये प्रती तोळा झाला आहे.

सोन्याबरोबरंच चांदीच्या भावात देखील आज मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. काल चांदीचा भाव 65 हजार रुपये प्रती किलो होता. आज हाच भाव 1300 रुपयांच्या वाढीसह 66 हजार 300 रुपये प्रती किलो झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्यासोबतंच चांदीचे भाव देखील सातत्याने वर खाली होत असल्याचं दिसून येत आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसांचा जरी विचार केला तरी या भावात मोठ्या प्रमाणात दरात चढ-उतार झाल्याचं दिसत आहे.

28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67 हजार 500 इतका होता, तो आज 66 हजार 300 रुपये इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या एका महिन्यात चांदीचे भाव चांगलेच घसरल्याचं पहायला मिळत आहे. 28 फेब्रुवारीचे भाव आणि आजचे भाव यांचा विचार करता चांदीच्या भावात तब्बल 1200 रुपयांची घसरण झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.

या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्वाच्या बातम्या-

भाऊ कदम कसे करतात स्क्रिप्टचे पाठांतर?, पाहा व्हिडीओ

देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली…

सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे…

‘ए जानू चल झाडू मार’; शिल्पा आणि राजचा हा…

श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोलिरा अन…;, पाहा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy