अबब… सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात को.सळले; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली | अलीकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भा.व गगनाला भि.डले आहेत. एक उत्तम गुं.तवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल 20 टक्क्यांची वा.ढ पहायला मिळाली आहे. यंदा देखील सोन्याच्या किंमतीत खूप जास्त वा.ढ होऊ शकते, असं अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

मात्र, आज सोन्याच्या किंमतीत मोठी घ.ट झाल्याचं पहायला मिळाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत तोळ्यामागे तब्बल 330 रुपयांची घ.ट झाली आहे. एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 49 हजार रुपये प्रती तोळा इतकी झाली आहे. मंगळवारी एमसीएक्सवर सोन्याचे हेच दर 49 हजार 330 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाले होते.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या द.रात देखील आज मोठी घ.ट पहायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर चांदीची किंमत 66 हजार 500 रुपये प्रती किलोवर बंद झाली होती. आज या किंमतीत 300 रुपयांची घट होवून चांदी 66 हजार 200 रुपये प्रती किलो इतकी झाली आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच अर्णब गोस्वामींना बा.लाकोट ह.ल्ल्याची माहिती दिली होती!”

सरकारकडून हळूहळू बंद होतंय घरगुती गॅ.स सि.लेंडरचं अनुदा.न; वाचा सविस्तर

दिल्लीतील शेतकरी आं.दोलन भ.डकलं, इंटरनेटसह मेट्रो देखील बंद; वाचा सविस्तर

सलग चार दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत क्षुल्लक वाढ; वाचा आजचे दर

‘त्या’ महिलेने ब.लात्काराचा आ.रोप मागे घेतल्यानंतर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…