सर्वसामान्यांंना दिलासा देणारी बातमी! पाहा पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?

मुंबई | अलिकडे काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

मात्र, तुर्तास तरी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. देशांतर्गत अनेक शहरांमध्ये इंधनांच्या किंमती हाय पातळीवर आहेत.

सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 91.17 रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेलची किंमत 81.47 रुपये प्रती लिटर आहे. जर पेट्रोल डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आल्या तर पेट्रोल 75 रुपये प्रती लीटरपर्यंत येऊ शकते.

सध्या आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. ओपेक प्लस देशांच्या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येवू शकतात.

पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

पेट्रोल दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. पेट्रोल दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच देशभरातून इंधनाचे दर कमी व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ आव्हान

‘विराट मैदानात जितका आक्रमक आहे तितकाच तो…’; अनुष्काने सांगितलं ‘ते’ सिक्रेट

…अन् जुळता जुळता तुटलं; ‘तो हा नव्हेच’ म्हणत नवरीने लग्नमंडपातच मोडलं लग्न!

मनसुख हिरेन यांच्या मृ.त्यूनंतर त्यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

…अन् अशाप्रकारे गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!