राज्यभर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, ऐन दिवाळीत पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ पहायला मिळली होती. त्यानंतर आता राज्यातील काही ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यातील थंडी वाढल्याचं दिसत आहे. पुण्यातील तापमानाचा पारा घसरल्याने राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद पुण्यात झाल्याचं पहायला मिळालं आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 10.3 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे आता स्वेटर, कानटोप्या, हातमोजे बाहेर निघाल्याचं दिसून येतंय.

राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत आहे. आताही थंडीचा ऋतू असला तरी हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाही. अशातच आता राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाची चिन्हे दिसत होती. अशातच आता हा कमी दाबाचा पट्टा भारतीय किनारपट्टीपासून दूर गेल्याचं दिसत आहे.

कमी दाबाचा पट्टा भारतीय किनारपट्टीपासून दूर गेल्यानं राज्यातील थंडी वाढली आहे. तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टी तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या 11 जिल्ह्यांत शनिवारी आणि रविवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणी विकंडचा प्लॅन करत असेल तर त्यांनी लांबचा प्रवास टाळावा, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात जर पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“…तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, बायकापोरांसह सगळे मुंबईत या”

“डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलोय”

 एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

  ‘…ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आलं’; मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे