मुंबई लाॅकडाऊनच्या दिशेने! आजची धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर

मुंबई | कोरोना महामारीने (Corona) मुंबईकरांच्या (Mumbaikar) नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाने मुंबईचं टेन्शन वाढवलं आहे. आजही कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे.

मुंबईत आज दिवसभरात 10,860 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 654 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज दिवसभरात 2 जणांनी प्राण गमावला आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 8,18,462 एवढी आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,381 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,52,012 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी देखील आता 110 दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईत दररोज 20 हजारांपेक्षा जास्त कोव्हिड रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लावावा लागेल, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

केंद्राच्या नियमांनुसार रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा जास्त झाली. तर लॉकडाऊन करावा लागेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनबाबत विचार केला जात नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र आता कोरोना रूग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं आता लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

पुण्यात उद्यापासून नवे निर्बंध! अजित पवार म्हणतात, “नियम पाळा नाहीतर…”

 …अन् जितेंद्र आव्हाड भाजप आमदाराला म्हणाले, “साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी”

 पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…

पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”