‘कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावं, अन्यथा…’; अनिल परबांचा इशारा

मुंबई | एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य शासनात करावं, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.

राज्य सरकारने वेतनवाढीचा निर्णय घेत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर देखील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत.

अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याची विनंती करत त्यांनी अल्टीमेटम देखील दिला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. अशातच आता अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

सध्या 52 हजार कर्मचारी कामावर नाहीत. त्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

काही लोकांचं निलंबन करण्यात आलंय, तर काही कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी येत्या दहा मार्चपर्यंत कामावर यावं, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची रोजी रोटी जाऊ नये, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

दरम्यान, कोणाचंही नुकसान होणार नाही, बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अपील करण्यासाठी मुदत देण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ओबीसी आरक्षणप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…’

“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू” 

घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर

फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना

 मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!