मुंबई | विविक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट (The Kashmir Files) नुकताच रिलीज झाला आहे. देशात सध्या हा चित्रपट चर्चेचा विषय बनलाय. राजकीय वर्तुळात देखील याचीच चर्चा होताना दिसत आहे.
या चित्रपटात सांकेतिक भाषेत जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
असातच आता फारूख अब्दुल्ला यांनी यावर आता समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे. जेव्हा तुम्ही या घटनेच्या चौकशीसाठी एक प्रामाणिक न्यायाधीश किंवा समिती स्थापन कराल तेव्हा सत्य बाहेर येईल, असं फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
या घटनेला कोण जबाबदार आहे ते तुम्हाला कळेल. जर फारूख अब्दुल्ला जबाबदार असेल तर फारुख अब्दुल्ला देशात कुठेही फाशी घ्यायला तयार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख किंवा केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी बोलले पाहिजे, जे त्यावेळी केंद्रीय मंत्री होते, असं म्हणत त्यांनी हात झटकले आहेत.
दरम्यान, जे लोक जबाबदार नाहीत त्यांना कोणत्याही पुराव्यांशिवाय दोष देऊ नका, असंही फारूख अब्दुल्ला यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता जम्मूच्या थंडीत राजकीय वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”
“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”
“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”
“राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजे”