लाईफ हो तो ऐसी! काहीही न करता लाखो कमवतोय ‘हा’ तरुण

टोकियो | कोरोनाच्या (Corona) आधीपासून जग आर्थिक संकटांना तोंड देत होतं. मात्र, कोरोनाने सर्वांच्या चिंतेत वाढ केली. कोरोनामुळे सर्वांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता.

कोरोना काळात अनेकांना मानसिक त्रास देखील होऊ लागला. काहीच्या स्वभावात फरक देखील जाणवू लागला आहे. अनेकजण एकटेपणाचा शिकार होऊ लागले.

जपान (Japan) एक असा देश आहे जिथं वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेकदा परिवारिक कार्यक्रमांसाठी सुट्टी दिली जाते. अशातच आता एका तरूणाने एक अनोखा व्यवसाय सुरू केला आहे.

जपानचा 38 वर्षीय शोजी मोरिमोटो (Shoji Morimoto) हा अतिशय अनोखं काम करतो. वास्तविकमध्ये, तो लोकांसोबत स्वत:ला भाड्याने देतो. शोजी मोरिमोटो फक्त अज्ञात व्यक्तींसह वेळ घालवतो.

ऐकायला कितीही विचित्र वाटत असलं तरी पण सत्य हे आहे की, शोजी मोरिमोटो स्वत:ला भाड्याने देऊन लाखो रुपये कमावत आहे. जपानमध्ये अनेक लोकं एकटेपणाचे शिकार आहेत.

अज्ञात लोक त्यांना भाड्याने घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवतात. त्यामुळे त्याला एका वेळेला 10 हजार जापानी येन म्हणजेच 7 हजार रूपये भेटतात. शोजी मोरिमोटो दररोज 2 ते 3 लोकांसह वेळ घालवतो. त्यांच्यासोबत फिरायला जातो. त्यांच्यासोबत गप्पा मारतो आणि जेवणही करतो.

घटस्फोटित लोक, आरोग्याच्या समस्यांमुळे त्रासलेले लोक किंवा इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक शोजीसमोर आपलं म्हणणं मांडतात आणि काहीवेळा ढसाढसा रडतात सुद्धा. त्यामुळे त्यांचं मन मोकळं होतं.

दरम्यान, शोजीच्या या जाॅब प्रोफाईलमध्ये मित्र बनवून घेणं, हे दोघांसाठी घातक असल्याचं शोजी मोरिमोटो म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘अशी वेळ कधीच आली नव्हती, मी यापूर्वी अनेकदा…’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर