ब्रासिलिया | हवामान बदलामुळे सध्या निसर्गाच्या चर्कीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर बदल जाणवू लागले आहेत. ऐन थंडीत देखील पावसाचा प्रकोप पहायला मिळत आहे.
हवामान बदलामुळे भुपृष्टावरच नाही तर समुद्रात देखील मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. त्याचा थेट परिणाम जगभर होणाऱ्या ऋतू चक्रावर होत आहे.
अशातच काही ठिकाणी जंगलात आग लागल्याची माहिती समोर येते तर कधी समुद्रातील मोठी चक्रीवादळं किनाऱ्यावर धडकतात. सध्या ब्राझिलमध्ये देखील हवामान बदलाचा परिणाम दिसून येत आहे.
सध्या ब्राझिलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे तेथील काॅफी या पिकाचं मोठं नुकसान देखील झालंय. अशातच आता ब्राझिलमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
पावसामुळे ब्राझिलमधील नद्यांना पूर आला आहे. अशातच एक नदीवरील पुल पडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नेहमीप्रमाणे लोकं पुलावरून जात असतात.
पुल मोडकळीस आल्याचं लोकांना माहिती असताना देखील लोक त्या पुलाचा वापर करत होते. अचानक काही लोक जात असताना त्यांना काही हलचाली जाणवू लागल्या.
काही लोकं काय झालं बघण्यासाठी मागे वळले आणि अचानक पुलाचा काही भाग हा खाली कोसळला. पुलावर असलेले काही लोकं पाण्यात वाहून देखील गेली आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं”
शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला!
शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल
‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा