मेरा भाई तू मेरी जान है! गोंडस भावांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | आयुष्यात प्रत्येक नाती खास असतात. त्यात भावा-भावाचं नातं म्हणजे एक वेगळीच भावना असते. लहान किंवा मोठ्या भावासाठी सगळं काही करण्याची तयारी देखील या नात्यात गुंतलेली असते.

अशातच लहान मुलांचा एक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे अनेक लोकांची मनं जिंकली आहेत.

या व्हिडिओमध्ये मुलांचा निरागसपणा आणि एका भावाचे दुसऱ्या भावावरचे प्रेम पाहून लोक भावूक होत आहेत. लहान मुलांचा हा अंदाज पाहून भाऊ दुसऱ्या भावाला व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.

11 सेकंदाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहणं तुम्हाला अगदी सामान्य वाटेल. पण, मुलांनी असं काही करून दाखवलंय ज्यानं लोकांची मनं जिंकली आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही दोन मुलं गर्दीच्या रस्त्यावरून चालताना दिसत आहे. तेवढ्यात समोरून एक कुत्रा येतो. कुत्र्याला पाहून मोठा मुलगा सावध होतो.

लहान भाऊ कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेला असतो. त्यामुळे त्याने अंगावर शाल घेतलेली दिसत आहे. पहिल्यांदा कुत्रा दोघांकडे जातो. त्यावेळी मोठा भाऊ कुत्र्यावर हात उगारतो.

त्यानंतर देखील कुत्र त्यांच्याकडे येण्याचं प्रयत्न करतं त्यावेळी मोठा भाऊ हात आणि लाथेनं कुत्र्याला लांब करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तिथून एक सायकल देखील जाते.

एवढं सगळं होत असताना देखील मोठा भाऊ लहान भावाच्या शाल धरलेला डोक्यावरचा हात काढत नाही. आणि त्याला नंतर पुढे घेऊन जातो.

11 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये नात्याची सखोलता लक्षात येत आहे. पैसा, प्राॅपर्टी आणि इतर क्लिस्क गोष्टींच्या पुढं नातं हेच महत्त्वाचं असतं, असा संदेश या व्हिडीओमधून मिळतोय.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीसंत पुन्हा कमबॅक करणार??? BCCI ने दिले ‘हे’ संकेत

“नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही”; अनिल परब यांचा दावा

 “कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, हिंदुस्थानी भाऊवर रुपाली पाटील कडाडल्या

रणबीरचा ‘हा’ चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली नोकरी, जाणून घ्या काय होतं कारण

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची