देश

अन् मुस्लिम महिलांना न्याय देणारं ‘तीन तलाक’ विधेयक राज्यसभेत मंजूर!

नवी दिल्ली |  मुस्लिम महिलांना न्याय देणारं ट्रिपल तलाक विरोधी विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी राज्यसभेत मंजूर झालं आहे. देशभरातून मोदी सरकारवर याबद्दल कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

आता तोंडी ट्रिपल तलाक देणं भारतात गुन्हा असणार आहे. देशभरातील मुस्लीम समाजाकडून मोदी सरकारचं कौतुक करण्यात येत आहे. 

व्हॉट्सअ‌ॅप, पत्र पाठवून, तोंडी तलाक यापुढे आता कायमचं बंद होणार आहे. यामुळे मुस्लिम समाजात मोठं आनंदाचं वातावरण आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने गेली अनेक वर्ष यासाठी आंदोलने सुरू होती. आज त्यांच्या सगळ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ट्रिपल तलाक विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार??? उद्धव ठाकरे म्हणतात…

-इस्रोच्या एकावर एक यशस्वी मोहिमा अन् केंद्र सरकार करतंय शास्त्रज्ञांच्या पगारात कपात!

-धनगर समाजासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

-राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पिचडांना मतदारसंघातील लोकांकडून धक्का!

वेल्हा तालुक्याचा ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची मागणी

IMPIMP