पुणे | सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्याव, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य असल्याचं भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य आहे. सर्वधर्मीय देवस्थान मधील सोनं 1 ते 2 टक्के व्याजाने सरकारने घ्यावं. कारण सध्या देश संकटात आहे अशा वेळेला दारू विकून किंवा जनतेला दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा हा पर्याय कधीही योग्यच राहील, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या अभ्यासू मागणीनंतर काही लोकांनी त्यांच्यावर धर्माच्या विरोधात अशा पद्धतीने टीका केली आहे. त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचं डोकं ठिकाणावर आहे तुमचं डोके ठिकाणावर ठेवून टीका करा, देवस्थान ही कोणाच्याच बापाची खाजगी मिळकत नाही, अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.
देवाला अर्पण केलेले पैसे, सोनं जे काही असते ते भक्तांनी मनोभावे अर्पण केलेलं असतं आणि त्याचा उपयोग जर देश संकटात असेल तेव्हा झाला तर नक्कीच देवालाही आनंद होईल, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…
-सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स
-बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, कारण…
-अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र
-20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा- संजय राऊत