“राजसाहेब मानलं तुमच्या दुरदृष्टीला, बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण झालं”

मुंबई | मराठी भाषा सक्तीचा वाद महाराष्ट्रात बऱ्याचदा उफाळून आला आहे. शिवसेनेची स्थापना मुळात मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी झाली होती. आता पुन्हा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्यात प्रत्येक दुकानावर मराठी नामफलक लावण्याची सक्ती करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.

राज्यात आता सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या असणार आहेत. सरकारने हा निर्णय घेताच राज्यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मराठी भाषेतील पाट्यांचा निर्णय झाला आणि पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

आपल्या ठाकरे शैलीत राज्यभर मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारे शिवसेनाप्रमुख अनेकांना आता या निर्णयामुळं आठवायला लागले आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीतच मराठीचा मुद्दा लावून धरणारे राज ठाकरे हे पुन्हा चर्चेत आहेत.

भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सरकारचा हा निर्णय म्हणजे राज ठाकरे यांच्या दूरदृष्टीचं फलीत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक वर्षांपासून मराठी नामफलकांसाठी आंदोलन करण्यात आली. मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल झाले त्या सर्व लढाईचा हा विजय आहे, असं देसाई म्हणाल्या आहेत.

आता राज्यात सर्व दुकानांवर मराठीत पाट्या दिसतील. याबद्दल राज ठाकरे यांचं अभिनंदन आणि त्यांचे बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यावर हा निर्णय घेण्यात आला याचा आनंद अधिक आहे, असंही देसाई म्हणाल्या आहेत.

माननीय बाळासाहेब ठाकरेंचं एक स्वप्न पुर्ण झालं, या शब्दात देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. देसाई यांनी राज ठाकरे यांच्या लढाईचं यावेळी कौतुक केलं आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र सरकारनं लागलीच अमंलबजावणी चालू करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना