पुणे महाराष्ट्र

पृथ्वीराज बाबांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाण्यापासून कोण रोखतंय बघतेच- तृप्ती देसाई

पुणे | देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावं, असा सल्ला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी घातली आहे. यावर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी भाष्य केलं आहे.

पृथ्वीराज बाबा तुम्हाला कधी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचं फक्त सांगा ही तृप्ती देसाई तुम्हाला त्या मंदिरात तुमच्या कुटुंबासह घेऊन जाईल कोण रोखतयं ते बघूच, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

देवाला सगळे भक्त समान असतात केवळ राजकारण म्हणून एखाद्याला मंदिरात बंदी असं कोणी जर म्हणत असेल तर  कोणी आवाज उठवला तर तो दाबण्याचं षड्यंत्र सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही बंदी घातली असं सांगून मंदिर तुमच्या मालकीचं आहे असं समजू नका. मंदिर हे सर्व भक्तांचं असतं आणि हे शिवशंकराचं मंदिर आहे आज देव मुर्तीस्वरूपात आहे. जर देव खरोखरच जिवंत स्वरूपात असता तर मंदिरात बंदी घालणार्यांना नक्कीच शिक्षा दिली असती, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-ग्रीन झोन असलेल्या बीडमध्ये कोरोनाचा शिरकाव; पाहा कोरोना कुठून कसा आला…

-कुणी 5 कोटी दिलेत, कुणी 500 कोटी… आम्ही आमचं आयुष्य देतोय; मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट

-“खडसेंना बाजूला करण्यात यांचा डाव; राज्यातील भाजप नेत्यांमध्ये तेवढी ताकद आणि हिम्मत नाही”

-अहो, त्याचा 1 वर्षाचा मुलगा गेलाय हो… ढसढसा रडणारच की!

-“मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही परप्रांतीय हातात, शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”