पुणे : मुख्यमंत्री मला इतके घाबरतात हे माहित नव्हतं, असं म्हणत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलंय. दारुच्या बाटल्यांचा हार घालून पुण्यात स्वागत करु, असा इशारा तृप्ती देसाई दिला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात येणार होती. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपूर्वीच पोलिसांनी तृप्ती देसाईंना ताब्यात घेतलं होतं.
पोलिसांनी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा संपवून पुण्यातून जात नाहीत तोपर्यंत तृप्ती देसाईंच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना घराबाहेरही जाऊ दिले नाही, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं आहे.
तातडीने महाराष्ट्रात दारूबंदी करावी. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्या पाच मुद्द्यांपैकी “दारूमुक्त महाराष्ट्र” हा मुद्दा घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे.
अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहेत. दारुच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार, असा संतप्त इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता.
महत्वाच्या बातम्या-
“शरद पवारांनी साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात लढावे अन् त्यांचा पराभव करावा” https://t.co/tjvxHcfxhJ @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
भारतासोबत युद्ध झालं तर पाकिस्तानच हरेल- इम्रान खान- https://t.co/Bk1Pgxg1ml #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
तुमचा पोरगा तुमच्यासाठी राबतोय… त्याला आशीर्वाद द्या- धनंजय मुंडे https://t.co/PrULAXSJL3 @dhananjay_munde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019