कुडाळ | राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता आणखी तापल्याचं पहायला मिळत आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं दिसतंय.
नगरपंचायत निवडणुकीपुर्वी शिवसैनिक आणि राणे समर्थक समारोसमोर आल्यानं आता कुडाळमध्ये मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यावरून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
नगरपंचायतीच्या आवारात गाडी नेण्यास मनाई असताना सुद्धा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आवारात गाडी आणली. त्यावर राणे समर्थकांनी आक्षेप घेतला.
त्यावरून आवारात चांगलंच वातावरण तापलं. त्यावेळी शाब्दिक चकमकी देखील झाल्या. त्यानंतर प्रकरण धक्काबुक्कीवर आल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
दोन्ही गटात पुन्हा राडा होऊ नये म्हणून कुडाळ परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं आहे. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील केला होता.
परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन डीवायएसपी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, कुडाळच्या नगरअध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल विजयी झाल्यात. त्यांना 9 मते मिळाली तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकरांना 8 मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेची काॅलर उंचावल्याचं पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Valentine’s Day | ‘तु माझा आहेस’; मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो
“काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे आहेत”
‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ
डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर
राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान