खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा- तुकाराम मुंढे

नागपूर | ‘लॉकडाऊन’ दरम्यान कुठलीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये. त्या अबाधित ठेवाव्या, असे आदेश देत कुठलेही कारण नसताना बंद आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

लॉकडाऊन हे लोकांनी घराबाहेर पडून कोरोना विषाणूचा प्रसार करु नये यासाठी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं आहे. मात्र शहरात अनेक खासगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी दवाखाने, ओपीडी, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचं काहीही कारण नाही.

विनाकारण सेवा बंद ठेवल्यास साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असं आदेशात नमूद केलं आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व संघटनांना हा आदेश पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या ही 200 पार गेली आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-धोक्याचा इशारा… रविवारी एकाच दिवशी तब्बल 22 कोरोनाग्रस्तांची नोंद

-कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय- अजित पवार

-कोरोनाच्या लढ्यात विठूरायाही आला मदतीला; विठ्ठल मंदिराकडून 1 कोटींची मदत

-कोटक बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटींची घसघशीत मदत

-कॉंग्रेसचे आमदार-खासदार कोरोनाच्या लढाईसाठी देणार एका महिन्याचं वेतन