धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

मुंबई | कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय म्हणून आळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची अवघ्या सात महिन्यात बदली झाली आहे. सध्या नागपूरमध्ये कोरोनाचा वाढता फैलीव रोखण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या होत्या. मात्र नागपूरचे महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्यामध्ये मोठया प्रमाणात मतभेद पाहायला मिळाले.

तुकाराम मुंढेंविरोधात भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्या आलं होतं. आता दोन दिवसांमागे मुंढेंना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी आपण घरातून आपलं काम चालू ठेवलं होतं. मुंढे यांनी कोरोना झाल्याची माहिती आपल्या ट्विटरवरून दिली होती.

माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतू माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. मात्र नियमांनुसार  विलगीकरणात राहणार आहे. गेल्या 14 दिवसांमागे माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं ट्विटमध्ये तुकाराम मुढेंनी म्हटलं होतं.

सोलापुरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त, पुण्यात पीएमपीएमएलचे अध्यक्ष त्यानंतर नाशिक महापालिका आयुक्त आणि आता नागपुरचे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी उत्तमरित्या काम पाहिलं. परंतू या प्रत्येक ठिकाणी सेवा बजावताना ते राजकारण्यांच्या निशाण्यावर राहिले. राजकारण्यांना नक्की काय वावडं आहे?, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मुंढे यांचं लोकांनी नेहमी कौतूक केलं आहे आणि लोकसुद्धा त्यांना आपल्या विभागात सेवेला असावं म्हणून मागणी करत असतात.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tukaram Mudhe Transfer00

महत्वाच्या बातम्या-

अजब चोरीची गजब गोष्ट! …म्हणून हा तरूण फक्त रिक्षावाल्यांचे मोबाईल चोरायचा; कारण वाचूल व्हाल हैराण

सुशांतचा मित्र संदीप सिंह विषयी धक्कादायक माहिती समोर!

‘कॉंग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील होऊ शकतो’; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

…तर मग आरोग्यमंत्री राजेश टोपेंवरही गुन्हा दाखल करा- सुजय विखे पाटील

…तर सीबीआयला रिया चक्रवर्तीला अटक करावीच लागेल- सुब्रमण्यम स्वामी