तुकाराम मुंढेंची धडाक्यात कामाला सुरूवात; दिला 4 कर्मचाऱ्यांना दिला

नागपूर |  देवेंद्र फडणवीस यांचा दबदबा असलेल्या नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर तुकाराम मुंडेंनी नेहमीप्रमाणेच धडाक्यात कामाला सुरूवात केली आहे. बुधवारी त्यांनी चार्ज घेतल्यानंतर महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या विभागात काम करत असलेल्या 4 कर्मचाऱ्यांना दणका दिला.

कामात अनियमितता आणि कामचुकारपणाचा ठपका ठेवत तुकाराम मुंढे यांनी 4 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंडे यांनी पहिल्या दिवशी अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या विकासकामांचे सादरीकरण दोन दिवसात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी त्यांनी अधिकाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले होते. आज हाच शिकस्ता मुंढेंनी कायम ठेवत विविध विभागाच्या बैठका त्यांनी घेतल्या.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी चार्ज स्विकारल्यापासून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेत कार्यालयात पोहचत आहेत. तसंच जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी जनता दरबारही सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नथुराम गोडसेला मानतो हे सांगायची मोदींमध्ये धमक नाही – राहुल गांधी

-कोरोना व्हायरस भारतात दाखल; केरळमध्ये पहिला रूग्ण आढळला

-देशप्रेमी नागरिकांनी मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं; बाळा नांदगावकरांचं आवाहन

-राज ठाकरेंच्या इंजिनाला भाजपचं इंधन?? राज आणि आशिष शेलार यांची तासभर चर्चा

-मुनगंटीवारांना हे शहाणपण आधी का सुचलं नाही?- नवाब मलिक