Top news नागपूर महाराष्ट्र

कोरोनाला हरवण्यासाठी खास नागपुरकरांसाठी तुकाराम मुंढेंनी काढला नवा आदेश

नागपूर | सरकारने 19 मे रोजी दिलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आलं होतं. मात्र शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यांची विनंती शासानाने मान्य केली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. याबाबतचे आदेश आजपासून अंमलात येईल. या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती नागपुरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालयं पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त जीवनावश्यक संबंधित दुकानं वगळता जास्तीत जास्त पाच सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केलं आहे. त्यामुळे विनाकारण नागपूरकरांनी बाहेर निघू नका अशा सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रामध्ये  कोरोनाची रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथिल न करण्याचा विचार राज्य सरकारने घेतला.

महत्वाच्या बातम्या-

-मुलीचा विवाह सोहळा पार पडताच गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

-डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

-“ज्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिलंय ते आंदोलन करतायेत, मेरा आंगण मेरा रणांगण”

-उद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

-लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन