संजय राऊतांवर तुषार भोसले भडकले, केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. याला भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांच्या भाजपचे साडेतीन नेते रडावर असल्याच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता तुषार भोसले यांनी उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहुन मागणी केली आहे.

तुषार भोसले यांनी संजय राऊत यांना निलंबीत करा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

पत्रात आचार्य भोसले म्हणतात, पत्रकार परिषदेतून खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु-संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) संस्कृतीला कलंक आहेत, अशी टीका तुषार भोसले यांनी केली आहे.

वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य, या संवैधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावं, अशी विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा निल सोमय्या हे दोघेही जेलमध्ये जाणार असल्याचं सूचक वक्तव्यही त्यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. यावर सोमय्यांनी (Kiriti Somaiya) पत्रकार परिषदे घेत उत्तरही दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘मामी गप्प बसा….’; शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याची अमृता फडणवीसांवर बोचरी टीका 

प्रेस कॉन्फरन्समध्ये सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, म्हणाले, ‘मारा मला मी…’

“खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण… “ 

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू