आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या; आत्महत्येच कारण अस्पष्ट !

मुंबई |  प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अनेक आत्महत्येच्या घटना कानावर आल्या. आता मागे काही दिवसांपुर्वी मराठी अभिनेत्रीच्या पतीने आत्महत्या केली होती. अशातच टीव्ही अभिनेता समीर खान याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समजली आहे.

समीर शर्मा हा एक मॉडेल आणि  प्रसिद्ध अभिनेता होता. त्याने ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे समीर शर्माच्या आत्महत्येने त्याच्या चाहत्यांना धक्का बसल आहे.

समीरच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याची माहिती मालाड पोलिसांनी दिली आहे. रात्रपाळीवर असलेल्या वॉटमनने समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली.

दरम्यान, समीरच्या मृत्युची आकस्मात नोंद केली असून समारने दोन दिवसांपुर्वी  आत्महत्या केली असल्याचा  संशय पोलिसांनी व्यक्त  केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

हजारोंचं जीवन उद्धवस्त करणाऱ्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे सावट

धक्कादायक! जन्मदात्यानेच पोटच्या मुलीवर लैगिक अत्याचार करत कुटुंबियांसोबत केलं ‘हे’ कृत्य

‘मी आजही संयम ठेवलेला आहे’, संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने महिलेने जुळ्या मुलांसह उचलंंलं हे मोठं पाऊल; थरकाप उडवणारी गोष्ट

पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला