आजचं आंदोलन भाजपच्या अंगलट?; सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड

मुंबई | ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशी भूमिका घेत भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी काळे मास्क, काळे शर्ट घालून काळे फलक झळकावत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनावरून सोशल मीडियात भाजपला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.

भाजपच्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडला. #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड बनला. अवघ्या काही तासांत हा हॅशटॅग वापरून तब्बल एक लाखाच्यावर ट्विट करण्यात आलंय.

भाजपसे महाराष्ट्र बचाओ , भाजप चुकतोय, ही वेळ एकत्र येऊन लढण्याची, राजकारणाची नव्हे, गुजरातच्या भल्यासाठी महाराष्ट्राला कर्जात लोटणारे म्हणतायत महाराष्ट्र बचाव, अशा अनेक पोस्टचा भडीमार करत नेटकऱ्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फटकारलं आहे.

भाजप कार्यालयाबाहेर काही मुलं हातात फलक धरून निदर्शने करत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो ट्विट करत काहींनी भाजपला खरमरीत सवाल केला आहे. राजकारणासाठी तुम्ही किती खालची पातळी गाठणार, असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून भाजपला करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

-आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

-“…तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती”

-निधीची गरज लागल्यास मागणी करा, तात्काळ देतो; अजितदादांचा पुणे महापौरांना शब्द

-अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर