नवी दिल्ली | सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेलं ट्विटर (Twitter) जगभर लोकप्रिय आहे. जगातील प्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडियामधील दिग्गज कंपनी विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विट करत माहिती दिली होती.
Elon Musk यांनी यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कटू शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.
44 अब्ज डॉलरच्या या मोठ्या व्यवहारानंतर ही कंपनी कोणत्या दिशेने जाईल हे त्यांना माहिती नाही. सोमवारी कंपनीच्या बैठकीत पराग अग्रवाल यांनी कंपनीचे भविष्य अनिश्चिततेच्या गर्तेत असल्याचं म्हटलं आहे.
पराग अग्रवाल यांनी पाच महिन्यांपूर्वी ट्विटरची जबाबदारी घेतली आहे. ट्विटर संदर्भात झालेला व्यवहार या वर्षांत पुर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, भागधारक आणि अमेरिकी नियमांची परवानगी घेणं आवश्यक आहे.
एका रिपोर्टनुसार पराग अग्रवाल यांनी कंपनीच्या बैठकीमध्ये पुढील अनिश्चिततेला स्वीकार केलं आहे. एकदा सदर करार पुर्ण झाल्यावर कंपनी कोणत्या दिशेने जाऊ शकते, हे सांगता येणार नाही, असं पराग अग्रवाल म्हणाले.
दरम्यान, Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता ट्विटर विश्वात एकच चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी दहावीत दोनदा नापास झालो पण…”, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत
अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
‘साहेबांसमोर सांगतोय, मला विक्रम काळेंची भीती वाटते’; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
चोरट्यांचा नाद खुळा! थेट बुलडोझरने फोडलं ATMचं मशीन; पाहा व्हिडीओ