Twitterचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांना आहे इतका पगार; आकडा ऐकून थक्क व्हाल

मुंबई | ट्विटरचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अग्रवाल यांनी जॅक डॉर्सी Jack Dorsey यांची जागा घेतली आहे. ‘मनी कंट्रोल’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अग्रवाल यांचा वार्षिक पगार आता 1 दशलक्ष डॉलर्स इतका असेल.

पराग अग्रवाल यांना सोबत बोनसही मिळेल, असं कंपनीने यु.एस. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे दाखल केलेल्या (SEC) फाइलिंगमध्ये म्हटलं आहे.

सोमवारी समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना कंपनीकडून तब्बल एक मिलियन डॉलर वेतन मिळणार आहे. दरम्यान त्यांच्या वेतनाबाबत वेगवेगळ्या वृत्तपत्राकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहेत.

एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार ट्विटरने त्यांना 1.52 मिलीयन डॉलर इतके वेतने दिलं आहे. दरम्यान ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डॉर्सी यांचे आभार मानले आहेत.

जॅक आणि मी चांगले मित्र आहोत. अजूनही आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जॅकचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खरंच जॅक यांचे आभार मानतो, असं पराग यांनी म्हटलं आहे.

भारतामध्ये जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी यापूर्वी मायक्रोसॉफ्ट (Microsoft)आणि याहूमध्ये देखील काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली होती.

कंपनीना टेक्निकली स्ट्रॉंग बनवण्यामध्ये त्यांचे मोठं योगदान होतं. 2017 मध्ये त्यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बनवण्यात आले आणि आता त्यांच्या खांद्यावर कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनताच ते समाज माध्यंमावर ट्रेंड झाले. अनेकांना त्यांना ट्विटर आता किती वेतन देणार याबाबतची उत्सुकता असल्याचं पहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या- 

फक्त ‘या’ एका गोष्टीमुळं पतंगराव वसंतदादांच्या नजरेत भरले!, पुढं आयुष्य बदललं 

‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ’; ‘या’ शिवसेना नेत्याचा तटकरेंना टोला 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; एअर इंडियानंतर ‘या’ कंपनीला विकणार 

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!

जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा…- देवेंद्र फडणवीस