Tata आहे तर शक्य आहे! ‘या’ दोन गाड्यांनी तोडले सर्व रेकॅार्ड्स

मुंबई | जानेवारी महिन्यात भारतात विकल्या गेलेल्या टॉप 10 कारच्या यादीत टाटा (Tata )मोटर्सच्या 2 सर्वात यशस्वी कार देखील आल्या आहेत.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon)ही सलग दुसऱ्या महिन्यात भारतात सर्वाधिक विक्री होणारी SUV म्हणून पुढे आली आहे. टाटांच्या एसयुव्हीने मारुतीच्या ब्रिझा आणि ह्युंदाईच्या क्रेटा सारख्या आघाडीच्या कारना मागे टाकलं आहे.

टाटा मोटर्सने (Tata Motors)मागील महिन्यात नेक्सॉन या (Nexon) एसयुव्हीच्या 13816 युनिट्सची विक्री केली. ही एका महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.

मागील वर्षी जानेवारीत 8225 नेक्सॉन गाड्यांची विक्री झाली होती. त्यात यंदा 68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने डिसेंबरमध्ये नेक्सॉनच्या 12899 युनिट्सची विक्री केली.

भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून Hyundai ला मागे टाकणाऱ्या टाटा मोटर्ससाठी नेक्सॉन हे एक जबरदस्त यशस्वी मॉडेल ठरलं आहे.

टाटा नेक्सॉन ही दोन इंजिनांचे पर्याय देते. 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन असे हे दोन पर्याय आहेत. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.2-लीटर DOHC 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन मोटर देण्यात आली आहे.

हे इंजिन 110 पीएस पॉवर आणि 170 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. डिझेल प्रकारात 1.5-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड रेव्होटोर्क इंजिन आहे जे 109 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करतं.

महत्वाच्या बातम्या- 

बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल 

राष्ट्रवादीला मोठा झटका; मालेगावमध्ये झालेल्या अपमानाचा काँग्रेसने घेतला बदला 

मोठी बातमी! बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये, धक्कादायक माहिती समोर 

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढलं

कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई