नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना नावाच्या महामारीशी दोन हात करत आहे. अशात कोरोना रूग्ण संख्येतील चढ-उतार चालूच आहेत.
उत्तर कोरिया सरकारनं आता कोरोनाचे दोन रूग्ण आढळल्यानं उत्तर कोरियात देशव्यापी लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे.
दोन वर्षात पहिल्यांदाच उत्तर कोरिया सरकारकडून अधिकृत माहिती सादर करण्यात आली आहे. यामध्ये आता देशात आपत्कालिन स्थिती असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गुरूवारी राजधानी प्योंगयांगमध्ये अनेक रूग्ण ओमिक्राननं संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. यावर सध्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत.
‘डेली मिरर’च्या माहितीनूसार देशात देशव्यापी लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही.
देशाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनी देशात कोविड निवारणात कोणतीही हलगर्जी चाळणार नसल्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली आहे.
देशाला दोन वर्ष सुरक्षित ठेवण्यात यश आलं होतं पण आता ते शक्य झालं नसल्याचं सरकारी माध्यमांनी कोरोना रूग्ण सापडल्यानंतर जाहीर केलं आहे.
दरम्यान, चीन आणि काही युरोपीयन देशांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता उत्तर कोरियातील परिस्थितीमुळं जगाची चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ अफलातून! गणेश मंडळाचा अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा प्रवास
सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा
“घोटाळेबाजांवर आता अंतिम कारवाई”; सोमय्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
“राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”
सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित