“दोन दिवसांपूर्वी महाजन यांनी 25 कोटींची जमीन अवघ्या दीड कोटीत खरेदी केली”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी  यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महाजन यांनी आपली पत्नी साधना महाजन यांच्या नावे दोन दिवसांपूर्वी 25 कोटी रुपयांची संपत्ती कवडी मोल भावात खरेदी केली असल्याचा आरोप पारस ललवाणी यांनी केला आहे. ललवाणी यांनी महाजन यांच्यावर केलेल्या धक्कादायक आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकंच खळबळ उडाली आहे.

रविवारी पत्रकारांशी बोलताना पारस ललवाणी यांनी महाजन यांच्यावर हे आरोप केले आहेत. यावेळी ललवाणी म्हणाले की, गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांच्या नावे दोन दिवसांपूर्वी सुमारे 25 कोटींची मालमत्ता अवघ्या दीड कोटी रुपयांत खरेदी केली आहे.

बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यात देखील महाजन यांचा हात आहे. तसेच जळगाव शहरातील मोठी शैक्षणीक संस्था हडपण्यासाठी गिरीश महाजन यांनी मोठा कट रचला होता. त्याबरोबरच आपल्या राजकीय विरोधकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करत अनेकवेळा महाजन यांनी त्यांचा छळ केला आहे, असे अनेक गंभीर आरोप देखील ललवाणी यांनी यावेळी केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांच्यावर एका घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवत ध.मकी दिल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये अॅड. विजय पाटील यांनी गेल्या 9 डिसेंबरला फिर्याद नोंदविली होती. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महाजन यांच्या विरोधात गु.न्हा दाखल केला आहे.

अॅड. विजय पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा ताबा मिळवण्यासाठी तानाजी भोईटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी मला संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने जानेवारी 2018 मध्ये पुण्यात बोलावून घेतलं होतं.

मी पुण्यात गेल्यावर तिथे त्यांनी मला चा.कूचा धाक दाखवून मा.रहाण केली. तसेच सर्व संचालक मंडळातील सदस्यांचे राजीनामे घेवून संस्थेचा कारभार गिरीश महाजन यांच्या हाती द्यावा, अशी मला ध.मकी देण्यात आली.

तसेच यावेळी गिरीश महाजन यांना व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. गिरीश महाजन व्हिडिओ कॉलवरून मला 1 कोटी रुपयांची ऑफर देखील देत होते, असंही विजय पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोरोनाची लस घेतल्यास महिलांना दाढी येईल’; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं गजब वक्तव्य!

शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार

एका चिमुरड्यानं केलं जयंत पाटलांचं फोटोशूट आणि पाटील म्हणाले…

‘धर्म बदल नाहीतर…’; दिवंगत गायक वाजिद खानच्या पत्नीचे वाजिदवर गंभीर आरोप!

भाजप आमदार गणेश नाईक राष्ट्रवादीत परतणार? गणेश नाईक म्हणाले…