मुंबई | Omicron BA.2 किंवा Steelth Omicron च्या रूपात परतला आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्वात वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. जिथं दररोज सुमारे पाच लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमिक्रॉन बीए. 2 सब व्हेरिअंट सर्वात वेगानं प्रसार होणारा व्हेरिअंट असल्याचं म्हटलं आहे.
तिसरी लाट संपल्यानंतर चीन, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ब्रिटन सारख्या देशांमध्ये या नव्या व्हेरिअंटचा उद्रेक होऊ लागला आहे. आता या व्हेरिअंटनं भारतातकी प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे.
तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यातील 18.4 टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन BA.2 सबव्हेरिअंट आढळून आला आहे.
या नवीन व्हेरिअंटबाबत केलेल्या अभ्यासानुसार, यात चक्कर येणं आणि थकवा ही दोन विशिष्ट लक्षणं आढळून आहेत. ही लक्षणं विषाणूची लागण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत जाणवू शकतात आणि ती जास्त काळ टिकू शकतात.
एका रिपोर्टनुसार, स्टेल्थ ओमिक्रॉन नाकाऐवजी आतड्यांवर अधिक परिणाम करतो, ज्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.
दरम्यान, संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) डेटा लोकांमध्ये कोणतीही भीती निर्माण करण्यासाठी जारी करण्यात आलेला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बायकोने ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली तर….’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात, अन् बेडवरून खाली पडतात”
Russia-Ukraine War | युद्ध आणखी भडकणार?, ‘या’ देशाची युक्रेनला मोठी मदत