मनोरंजन

…या दोन मराठमोळ्या मुलींनी आपल्या अदाकारीनं जिंकलं साऱ्या महाराष्ट्राचं मन

मुंबई | महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दोन मुलींच्या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या दोन्ही मुलींनी आपल्या कलेच्या जोरावर साऱ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे.

अदा आणि अंकिता अशी या मुलींची नावं आहेत. आमचं हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल, असं म्हणत त्यांनी “रेशमांच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी” हे गाणं सादर केलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडीओ बनवला आहे.

वादन, गायनासोबतच नृत्याची कसरत दोघींनी लिलया पेलल्याचं या व्हिडीओत दिसतंय. मधूर आवाजामुळे दोघींनी या व्हिडीओद्वारे समस्त मराठीजनांनी मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडीओला चांगली पसंती मिळत असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तसेच लाईक्स आणि कमेंट्सचा या पोस्टवर अक्षरशः पाऊस पडत आहे.

पाहा व्हिडीओ-

महत्वाच्या बातम्या-

-उठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग

-लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून अजब शिक्षा, म्हणाले…

-“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”

-भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

-UPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय