कोरोनाची ‘ही’ दोन नवीन लक्षणं आली समोर; दिसताच लगेच टेस्ट करुन घ्या!

नवी दिल्ली | जगभरात सध्या कोरोनाचा (Corona) नवा व्हेरियंट ओमिक्राॅन (Omicron) धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाश्चिमात्य देशात हजारोंच्या संख्येत ओमिक्राॅनबाधित रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता काही शहरांमध्ये लाॅकडाऊन (Lockdown) लावण्याची वेळ आली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत माहिती देण्यात येत असून, लक्षणे आढळल्यास तातडीने आयसोलेट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशात कोरोनाची आणखी दोन नवे लक्षणं समोर आली आहेत.

डॉक्टरांनी कोरोनाच्या अशा काही लक्षणांबाबत इशारा दिला आहे, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. यामध्ये डोळे लाल होणे किंवा केस लवकर गळणे यांचा समावेश होतो.

कोरोना विषाणू एंजियोटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम 2 (ACE2) नावाच्या एन्झाइमद्वारे लोकांच्या पेशींमध्ये प्रवेश करतो. हा विषाणू डोळ्यांद्वारेही शरीरात शिरण्याची भीती आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा कोरोना शरीरावर ACE2 एंझाइमद्वारे हल्ला करतो तेव्हा लोकांना वाटते की हा एक सामान्य व्हायरल हल्ला आहे.

डोळ्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर कोरोनाव्हायरस रेटिना आणि एपिथेलियल पेशींवर हल्ला करतो. या दोन्ही पेशी डोळे आणि पापण्यांचे काही भाग पांढरे करण्याचे काम करतात .

केस गळण्याचे प्रमाण वाढणे हे कोरोनाचे दुसरे नवीन लक्षण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ताप किंवा आजारपणामुळे केस गळण्याची केसेस 2-3 महिने दिसतात. तथापि, तुम्ही तंदुरुस्त दिसत असाल आणि तरीही केस गळत असाल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशा वेळी तातडीने कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. उपचारानंतर 6 ते 9 महिन्यांत केस गळणे थांबते.

ब्रिटनमधील परिस्थिती अशी आहे की, दररोज हजारो नवीन कोरोनाव्हायरसची प्रकरणे नोंदवली जात आहेत. तिथे कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराने जवळपास संपूर्ण ब्रिटनला वेठीस धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

लहान मुलांच्या लसीकरणासाठी शाळा सज्ज; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार तातडीची बैठक

आरोग्य विभागात खळबळ; ‘या’ हॉस्पिटलमधील 84 डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुख्यमंत्री-राज्यपाल पुन्हा आमने सामने; राज्यपालांकडून चौकशीचे आदेश

सुप्रिया सुळेंनी पटकावला नंबर वनचा किताब, लोकसभेत दमदार कामगिरी

भाजप आमदार म्हणतात, “मी अजितदादांचा फॅन, मी त्यांचं…”