नागपूर : लाच म्हणून पोलिसांनीच शरीरसुखासाठी तीन तरुणींची मागणी केल्याच्या प्रकरणाची नागपूर पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर सामाजिक सुरक्षा शाखाच बरखास्त करण्यात आली आहे.
नागपूरमधील दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून तीन वेश्या आणि 35 हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला होता. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पोलिस उपनिरीक्षक दामोदर राजुरकर आणि पोलिस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा या दोघांना अटक झाली होती. हे दोघंही नागपूर पोलिसातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत होते. त्यामुळे हे पथकच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूरमध्ये एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी तिला बेड्या ठोकण्याऐवजी तिला मोकळीक दिल्याचं समोर आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात अल्पवयीन प्रेयसीची लॉजवर हत्या करुन प्रियकर पसार! – https://t.co/dx5ZdEdDCC #Pune
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
“मी इच्छुकांना वैतागून नगरला येणं टाळतो” – https://t.co/VAjqXfAEKC @drsujayvikhe
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
रोहित पवारांच्या उपस्थितीत सरपंचासह भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश- https://t.co/zl4WRtYA3p #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019