दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…

चंदीगड | लोकसंख्येच्या बाबतीत भारतात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही वर्षात भारत आघाडीच्या चीनला देखील मागे सोडेल. अशाच भारतात जुनी मुलं देखील पहायला मिळतात.

सरकारी आकड्यानुसार एक लाखामागे 9 जुळी मुलं जन्माला येतात. पण दोन जीव असताना एकच शरिर असलेला माणूस पाहिलाय का?

दिल्लीच्या सुचेता कृपलानी रुग्णालयात 14 जून 2003 ला सोहना-मोहनाचा जन्म झाला. सोहना आणि मोहना जन्माला येताना दोन जीव असताना एकच शरिर असताना जन्माला आली.

जन्मानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या आई वडिलांना हे मुल मान्य नव्हतं.

जन्मानंतर गरिबीमुळे त्यांच्या आई-वडिलांनी सोहना आणि मोहनाला सोडून दिलं. दोघांच्या जीवाला धोका असल्याने डाॅक्टरांनी दोघांचं ऑपरेशन केलं नाही.

त्यानंतर पिंगलवाडा चारिटेबल ट्रस्टने या दोघांचा सांभाळ केला. हळू हळू मोठं होत असताना दोघांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं.  दोघांनी इलेक्ट्रीक डिप्लोमाचा कोर्स या दोघांनी पुर्ण केला.

नोकरीच्या शोधात असलेल्या या सोहना-मोहनाला आता पंजाब सरकारने नोकरी दिली आहे. सोहना आणि मोहना आता पंजमधील स्टेट पावर कॉर्पोरेशनमध्ये मेन्टेन्स कर्मचारी म्हणून काम करणार आहेत.

ख्रिसमसच्या तोंडावर पंजाब सरकारने दिलेल्या नोकरीमुळे दोन्ही भाऊ आनंदात आहेत. अनेक संकटांचा सामना करत या दोघांनी शिक्षण पुर्ण केलं. त्यामुळे हा आनंद त्यांना गगनात मावेनासा झालाय.

दरम्यान, पंजाब सरकारचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तर नोकरी दिल्याबद्दल सोहना-मोहनाचे आभार मानले असून आम्ही पुर्ण मेहनत करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

“यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, रिश्ते में ये हमारा बाप लगता है”

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल

1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज