सातारा | मी कधीच बेशिस्त नव्हतो. कोणाचाही स्वभाव हा एकसारखा नसतो. आपल्याकडे लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याची मुभा आहे, असं म्हणत उदयनराजे भोसलेंनी सामानातून मारलेल्या टोल्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
कॉलर उडवणं बेशिस्त आहे का? पण मग आतापर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, ही शिस्त म्हणायची का? या सगळ्यावर मी उत्तरे देऊन झाली आहेत. स्टाईल इज स्टाईल यार, माझी कमिटमेंट ही लोकांशी आहे आणि शेवटपर्यंत राहील, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी उदयनराजेंचा बेशिस्तपणा खपवून घेतला पण अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणं, कॉलर उडवणं किंवा इतर नाट्यछटा करणं असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत. भाजपत प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही.शिस्तीचं वळण राजांना लागत आहे, त्यांचं अभिनंदन!, असा खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून उदयनराजेंना लगावण्यात आला आहे.
उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहेत. त्यांना हवं तेव्हा ते कॉलर उडवू शकतात, ती त्यांची स्टाईल आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये टोलेबाजी पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभेच्या भूमिकेबाबत शरद पवार स्वत: राज ठाकरे यांच्याशी बोलणार! https://t.co/jbw6caB0wI @NCPspeaks @PawarSpeaks @RajThackeray @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश – https://t.co/mec5nzefVB
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
बॉयफ्रेंडच्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा पेंडसेनं फटकारलं; म्हणते…- https://t.co/8KbqyyQ99d #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019