सातारा | काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ईडीने नोटीस बजावली होती. त्यावरून साताऱ्यात वाद निर्माण झाला होता.
या प्रकरणावरुन आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale)आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली होती.
अशातच मागील काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने आले आहेत.
सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
“काय बाई सांगू, कसं गं सांगू मलाच माझी वाटे लाज काही तरी मला झालंय आज”, असं म्हणायची वेळ आली आहे. नारळ फोडी गँग, आम्ही नारळ फोडत नाय. आम्ही नारळ फोडतो कारण कामं केली, असं म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांना टोला लगावला आहे.
एखाद्याचं संपूर्ण घरदारतर उद्धवस्त केलं नाही. चर्चेला येयचं असेल तर कधीही, उदयनराजे कधीही तयार आहे. पण धाडस पाहिजे. काय बोलायचं, असं म्हणत उदयनराजे भावूक देखील झाले आहेत.
या ठिकाणी एवढं प्रेम तुम्ही मला दिलं. मी पैसे कमवले नाही. कमवलं तर तुमच्या सगळ्याचं प्रेम कमावलं आणि ते कधीही गमवणार नाही. तुम्हाला बघताना पारणं फिटतं तसं झालंय, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
एवढा तुम्ही मला जिव लावला त्याची कशी परतफेड करू हे मला माहिती नाही, असंही उदयनराजे म्हणाले आहेत. कामच्या स्वरूपात मी ते करतो. आय लव यू टू टू मच इन्फिनिटी, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
दरम्यान, नारळ फोडी गँग असा उल्लेख करून उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांना डिवलचं आहे. त्यामुळे आता शिवेंद्रराजे यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाहा व्हिडीओ-
“काय बाई सांगू, कसं ग सांगू” pic.twitter.com/A2zNVQ6ai3
— Saurabh Spotlight (@spot_the_lights) December 24, 2021
महत्त्वाच्या बातम्या –
बड्या साहेबांचा बडा घोटाळा! सुपेंकडे पुन्हा सापडलं ‘इतक्या’ लाखांचं घबाड
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”
‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल
1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज
फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…