सातारा | सध्या सर्वत्र पुष्पा या चित्रपटाचा जलवा चालू आहे. चित्रपटानं कमाईच्या बाबतीत अनेक आघाडीच्या चित्रपटांना देखील मागं टाकलं आहे. चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनचा अंदाज सर्वजण फाॅलो करत आहेत.
या चित्रपटातील बलम सामे या गाण्यानं तर सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. परिणामी अनेकजण या गाण्याच्या मोहात पडले आहेत. सर्वजग या गाण्याच्या तालावर नाचत असताना राज्यसभा खासदार उदयनराजे हे तर कसं मागं राहणार.
उदयनराजे यांनी या गाण्यावर आपल्या खास काॅलर शैलीत पोज दिल्याचं व्हायरला झालं आहे. उदयनराजेंची काॅलर उडवण्याची ख्याती तर सर्वत्र प्रसिद्ध आहे.
साताऱ्यात आय लव सातारा या ठिकाणी उदयनराजे लुंगीवर कार्यकर्त्यांसह आले होते. त्याठिकाणी त्यांनी फोटो काढले अन् आपल्या कार्यकर्त्यांना बोलून आपल्या गाडीत जाऊन बसले.
गाडीत बसतेवेळी गाडीमध्ये सामे सामे हे गाणं चालू होतं. हे गाणं ऐकल्यानंतर राजेंना कार्यकर्त्यांना एक पोज देण्याची विनंती केली. लगेच उदयनराजेंनी आपल्या खास शैलीत अल्लू अर्जूनची शैलीदेखील करून दाखवली आहे.
सातारकरांना नेहमीच उदयनराजेंच्या खास शैलीची भुरळ पडते आता तर राजेंनी खास लुंगी घालून पोज दिल्यामुळं येत्या काही दिवसात साताऱ्यात अनेकजण लुंगीवर दिसण्याची शक्यता आहे.
सध्या उदयनराेजंचा हा अंदाज सर्वत्र व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर राजेंचा हा व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहते त्यांच्या या व्हिडीओला शेअर करत आहेत.
दरम्यान, उदयनराजे हे आपल्या बिनधास्त अंदाजासाठी राज्याच्या राजकारणात ओळखले जातात. कसलीही तमा न बाळगता कोणत्याही परिस्थितीत आपल्या शैलीत जगणं हे उदयनराजे यांचं वैशिष्ट्य आहे.
पाहा व्हिडीओ –
पाहा उदयनराजेंचा वेगळा अंदाज. #उदयनराजे#पुष्पा pic.twitter.com/sKgUHCtmqi
— Lakhan Haridas Dalve (@Dalve_Lakhan) January 16, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
फटे स्कॅम! शेअर मार्केटच्या नावावर बार्शीच्या विशालनं लावला कोट्यावधींचा चुना
“कंडोमपेक्षा कोरोना टेस्ट महत्त्वाची, सेक्सपूर्वी हे नक्की करा”
किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद