‘…तर होय, आम्ही भ्रष्टाचार केला आहे’; उदयनराजे संतापले

सातारा | सातारा सर्वांगाणं समृद्ध आणि सुंदर असा प्रदेश आहे. सातारा भागात राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तुत्वाचा अमिट ठसा उमटवणाऱ्या नेत्यांचा जन्म झाला. सातारा आता छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या वादामुळं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका जमिनीच्या प्रकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आता पुन्हा एकदा इनोव्हेटीव्ह सातारा या योजनेवरून दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात हा वाद चर्चेत आहे.

इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना साताऱ्याच्या सर्वांगिण विकासात भर टाकणारी आहे. समाजाची आणि समाजहित साध्य करून घेणारी चिरकाल टिकणारी योजना म्हणून इनोव्हेटीव्ह सातारा योजना गणली जाईल, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा शब्दाचं अचूक स्पेलिंग आणि अर्थ सांगता येत नाही अशा लोकांनी आमच्या इनोव्हिटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी बोलू नये, अशी टीका उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर केली आहे.

जनमानसात आमची एक वेगळी छबी आहे. आम्ही सामान्य जनतेकरीताच आजपर्यंत जीवन व्यतीत केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

साताऱ्यातील लोकांच्या गतीमान सोयी, सुविधांसाठी कोणत्या योजना राबवणं, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय, आम्ही भ्रष्टाचार केला आहे, असं उदयनाराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, सातारा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं देखील या दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगलेला असतो. एकाच पक्षात राहूनही दोन्ही नेते एकमेकांविरूद्ध वक्तव्य करत असतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

Bappi Lahiri | ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन!

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा