सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात पोहोचताच त्यांनी शासकीय विश्रामगृहावर शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.
यावर विचारलं असता आमच्यात कधी वाद नव्हता तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोक आमच्यात भांडण लावत होती, असा आरोप साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
यापुढे आता आमच्यात वाद नसणार, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे. उदयनराजे यांच्याशी झालेली बैठक ही औपचारीक असल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी दिली होती.
दरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे.
पोटनिवडणूक लढवण्यासाठी आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पण या पोटनिवडणुकांमध्ये मीच निवडून येणार असल्याचा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मला भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट- https://t.co/pFCpaBfJkr #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
“भाजपमध्ये प्रवेश करताच उदयनराजेंना शिस्त लागतेय… त्यांनी कॉलर उडवली नाही”https://t.co/17zPxtOKCL @Chh_Udayanraje @uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण – https://t.co/VRSUfY8aRH @nitin_gadkari @duttsanjay
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019